Kavita's Kaleidoscope
२०१९ मागे वळून पाहताना
2019-looking-back
चिंतन
Kavita Saraf
8/1/20261 min read

२०१९ मागे वळून पाहताना
MBA करत असल्यापासून हि सवयचं लागली आहे self-reflection ची. कसं आणि किती पटकन गेलं २०१९ वर्ष ? आणि काय काय achieve केलं ह्या वर्षी? शुभारंभ गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाने झाला, खूप वर्षांनी व्यासपीठावरून मराठीत बोलले आणि लोकांनी भरभरून कौतुक केले. Ashwood point घर बघितले आणि ते आम्हाला घेता आले, घर शिफ्ट केले. राहुलने जॉब सांभाळून, ७-८ प्रोजेक्ट्स घरासाठी पूर्ण केले. मी Driving license मिळवले, गाडी घेऊन रोज ९८ मैल जाण्या येण्यामुळे ड्रायविंगचा आत्मविश्वास आला. दोनदा त्याचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी पण झाला त्याचा तर विशेष आनंद झाला. आजोबांचं वाक्य सार्थ केलं - 'दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास'.
AWS Cloud certification केलं. ऑफिस प्रोजेक्ट बदलले, नव्या लोकांबरोबर काम सुरु केले. धमाल मस्तीच्या short ट्रिप्स केल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून २०१९ मध्ये गजानन महाराज मंदिर स्थापन झाले शिकागो मध्ये आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांना सक्रिय सहभाग घेता आला. प्रगट दिनाचा अनुभव गाठीशी बांधून गुरुपौर्णिमेला पण इंग्लिश मध्ये गुरु ह्या विषयावर बोलता आले. साना आणि स्वरा नवीन शाळेत आणि डेकेयर मध्ये रुळल्या. सानाने एकूणच केलेली प्रगती - maths, band, languages, projects पाहून तिच्या शाळेने पण तिला Scullen Star announce केले. आता extra curricular tae kwon do सुरु होईल दोघींचं.
मुख्य म्हणजे २०१७ पासून GMADP परिवारातली सुरु झालेली मैत्री अजूनच घट्ट झाली. मित्र मैत्रिणी असे की ज्यांना आपण बोललेलं कळतं, आपले विनोद ज्यांच्यापर्यंत पोहोचतात, ज्यांचा आपण bouncing बोर्ड म्हणून सल्लामसलतीसाठी उपयोग करू शकू आणि जे प्रामाणिकपणे आपल्याला योग्य मार्ग निवडण्यात मदत करतील.
मेडिटेशन, त्वचा आणि आरोग्याकडे नियमित लक्ष सुरु केल आहे. सेल्फ हेल्प व्हिडिओज बघितले- ते आचरणात आण, हे करता करता व्यायाम रेग्युलरली केला. स्वतःसाठी सुट्टी घेता आली. नातेसंबध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. Naperville Library जॉईन केली आणि गिरगावनंतर पहिल्यांदाच खूप मस्त वाटलं पुस्तकांच्या संगतीत. हावरटासारखी पुस्तकं सुरु केली आहेत वाचायला.... कविता, चारोळ्या केल्या, ज्या बऱ्यापैकी जमल्या बहुतेक ? आता रेग्युलरली लिहीत व्हायचं आहे बघूया कस जमत ते ? फार छान नाही जमलं तरी काय जमत नाही आहे ते तरी कळेल. Simon Sinek म्हणतो तसं I am a player of an infinite game, so I need to be better tomorrow than I am today…
२०१९ खूपच छान गेलं, महाराज कृपेने २०२० पण ह्यापेक्षाही चांगले असणार आहे, स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती करण्यासाठी पूरक. त्यासाठी थँक यू २०१९ आणि वेलकम २०२०.....
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations