selective focus photography of orange leaves

सृष्टी-निसर्ग प्रेम-परिपक्वता

सृष्टी-निसर्ग प्रेम-परिपक्वता

POETRY

11/2/19971 min read

white clouds and blue sky

सृष्टी-निसर्ग प्रेम-परिपक्वता

हिरव्या रंगांची कात टाकून रंगांची ही मुक्त उधळण

जणू सृष्टी निसर्गावरच्या प्रेमाचे विविध आविष्कार दाखवते आहे

पानांची सळसळ जशी काही लगबग निसर्गाच्या स्वागताची

कधी ऊन, कधी पाऊस, कधी बोचरा वारा आणि थंडी

ह्या सगळ्या निसर्गाच्या लहरींचा परिणाम सृष्टी प्रेमिकेवर दिसतो आहे जागोजागी

झाडांच्या लाल-जांभळ्या रंगांची लाली जणू प्रेमात लाजून चूर झालेली सृष्टी

हिरव्या-पिवळ्या रंगांची आभा जणू निसर्गाला दटावणं-धमकावणं

की प्रतारणा केलीस तर पेटून उठण्याची क्षमता आहे माझ्यात

मग निसर्गही सृष्टीला घाबरून स्तब्ध

आणि सृष्टी शहारली निसर्गाच्या स्तब्धतेने पानगळ होऊन

काहीतरी गूढ रम्य संवाद आहे ह्या दोघांत

जो सूचित करतो आहे परिपक्व प्रेम - सृष्टी आणि निसर्गामधलं

सृष्टीला जाणवलं की हा तर शरद ऋतू मज समीप,

झाले परिपूर्ण क्षणिक

निसर्गाच्या कलांनी बेजार झालेली सृष्टी शरण गेली त्याला ..

अनामिक हुरहूर दाटली

की हे सगळं निसटून जाणार आहे एका तडाख्यासरशी..

हेमंत ऋतू चाहूल देई, थकून-शमून जाई सृष्टी

वृक्ष रुक्ष होऊनि देई पुष्टी