selective focus photography of orange leaves

|| गजानन मूर्ती दिसे डोळा ||

|| गजानन मूर्ती दिसे डोळा ||

POETRY

5/19/20211 min read

white clouds and blue sky

|| गजानन मूर्ती दिसे डोळा ||

गजानन ही 'माऊली' ।

भक्तांची ती 'साऊली' ।।

'पृथ्वी' पितांबर नेसली ।

'आप' शेला ल्याली ।।

'तेज' शाल पांघरली ।

'वायू' चवरी ढाळीली ।।

'अंबर' पगडी घातली ।

'मूर्ती' साजिरी सजली ।।

नको पाहू 'बाह्यरंगी' ।

जाण काय 'अंतरंगी' ।।

'पंचतत्वे' आली पूजेसी ।

पंचतत्वे तुही 'बनलासी' ।।

मूर्ती 'सावळी' गोमटी ।

तीच माझी 'प्रतिकृती' ।।

नको करू 'तुलना' ।

होशी तुही 'बापुना' ।।

म्हणसी मला 'माऊली' ।

मग 'शंका' कसली ? ।।

माये तुला 'सांभाळी' ।

जीवे नको 'आबाळी' ।।

ठेव असा 'विश्वास' ।

मनी जसा 'ध्यास' ।।

'पूर्ण' होई तो खास ।

मग येई 'दर्शनास' ।।

गजाननाची ही 'ग्वाही' ।

'सांगे' दिशा दाही ।।

© कविता सराफ

May 19th 2021