silhouette of 3 people standing on mountain during sunset

Letter to Tai after EMBA

Letter to my elder sister after completing EMBA

KRUTADNYATA

Kavita Saraf

5/19/20211 min read

white clouds and blue sky

प्रि य ताई ,

MBA Graduation नं तर ज्यांच्यामुळे हे शि क्ष ण पूर्ण करू शकले त्यांना मी THANK YOU note लिहिल्या आहेत. मी जेव्हा GCP opportunity मिळाली तेव्हा साशंक होते कि मी दोन लहान मुलींना घेऊन एकटी राहू शकेन किंवा नाही पण घरून मदत मिळाली आणि थोड्या दिवसांनी राहुलला पण USA मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि गोष्टी थोड्या सोप्या झाल्या. हा निर्णय घ्यायला नेहेमीप्रमाणेच तुझी खूप मदत झाली. आपल्याकडे कितीही चांगली निर्णयक्षमता असेल तरी ती कोणी प्रोत्साहन दिल्याशिवाय आपण बरोबर निर्णय घेतला आहे त्याची खात्री पटत नाही. तू वेळोवेळी मला पटवून दिलेस की हे मला जमेल आणि माझा आत्मविश्वास वाढला.

मला कधी कधी वाटतं की आई आणि तू नसतात तर मी काय केले असते ? माझा क वर्गातला प्रवेश, अभ्यासाची लागलेली गोडी आणि नंतर सुद्द्धा चांगले शिक्षण हे फक्त तुम्हा दोघींमुळे पूर्ण करू शकले. आपण गिरगावात राह्यल्यामुळे आणि आई दादांनी आपल्याला कीर्तन, प्रवचन, नाटक, व्याख्यानमालेची गोडी लावल्यामुळे भाषेवर आणि मनावर खूप चांगले संस्कार झाले. आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खूप मोलाची मदत झाली आहे ह्या सगळ्या गोष्टींची. कुठलाही कठीण प्रसंग पार पाडताना नक्कीच हाती लागत काहीतरी ह्यामधून आणि पुढे जाण्याचं बाळ मिळतं.

माझ्या लग्नाच्या वेळी तू आणि माईने हे कार्य आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडायचे म्हणून आई बरोबर कंबर कसली होतीत. आई गेल्यानंतर मी जेव्हा दुसऱ्या बाळाचा विचार करत होते तेव्हा तू मला, काळजी करू नकोस मी येईन आणि मदत करेन असं म्हटलंस तेव्हा मी ठरवले की आपण दुसऱ्या बाळाला चांगलं वाढवू शकू. लग्नाच्या वेळी कन्यादान करताना घेतलेली जबाबदारी तू साना आणि स्वराच्या वेळेस मदत करून निभावलीस.

पुढे मी MBA करायचे ठरवले तेव्हा सुद्धा तू हे कर आणि तुला जमेल असा विश्वास दिलास. आम्ही खूप त्रासातून जात होतो EAD Card आणि Visa प्रोसेसच्या वेळी तेव्हा मला सध्या फक्त आम्ही एकत्र आहोत, नसतो तर किती कठीण झाला असता हा विचार कर आणि पुढे जा असा positive thought दिलास.

मी skype/phone वर बोलताना खूप चिडचिड करते आणि तडक बोलते पण मी माझ्या वागण्याचा विचार केला तेव्हा मला जाणवले आहे की माझी आपल्या माणसांवर माझी खूप चिडचिड होते. लोकांच्या देखत पण कधीकधी अस केले आहे आणि त्याबद्दल मनापासून SORRY.

आजूबाजूला तू, माई, राहुल, साना आणि स्वरा नसतात तर मी हे पूर्ण करू शकले नसते. माझ्यासाठी एकेक पायऱ्या पार पाडणे म्हणजे कसोटी आहे पण आता इतकी risk घेतली आहे तर पुढचा प्रयत्न करून बघायचा आहे.

रेणुकाला पण खरे तर अभ्यासाची गोडी लागली तर खूप चांगले होईल, तिला अभ्यासात मदत लागली तर आम्ही आहोत तिला मदत करायला पण तिने थोडा तरी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

ह्या क्षणी आई आणि दादा हवे होते पण आता मी असा विचार करते आहे की त्यांनी आपल्याला जे शिकवायचे होते ते खूप थोड्या वेळात शिकवले आणि आता आपल्याला आयुष्य आहे त्यांनी शिकवलेल्या संस्कारांबरहुकूम वागण्यासाठी. माझ्यासाठी तू आणि माई हेच माहेर, आपण तिघींनि एकमेकांबरोबर एकत्र काढलेला वेळ म्हणजेच आपलं माहेरपण. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या पाठीशी तू आणि माई आहात.

कविता