Kavita's Kaleidoscope
माहित नाही असं का?
माहित नाही असं का?
POETRY
Kavita Saraf
10/10/19971 min read

पावसाच्या सरीबरोबर
चिंब भिजावसं वाटतं
पुढे टाकलेलं पाऊल मागेच थबकतं
माहित नाही असं का होतं?
वाऱ्याच्या झुळकीसरशी
मन पिसासारखं हलकं होतं
तरंगावसं वाटताना जमिनीवरच राहून जातं
माहित नाही असं का होतं?
जेव्हा संवाद साधू पहाते
शब्दचं मुके होतात
ओठांच्या आड दडून बसतात
माहित नाही असं का होतं?
भावनांच्या आंदोलनाने
मन माझं हिंदकळतं
पण सारंच व्यक्त नाही करू शकत
माहित नाही असं का होतं?
असं सगळ्यांचं होतं ?
का फक्त मलाच असं वाटतं ?
खरंच कळत नाही असं का होतं ?
© कविता कुलकर्णी
10th Oct 1997
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations