body of water during golden hour

मन-सागर

Mansagar

POETRY

Kavita Saraf

4/24/20001 min read

white clouds and blue sky

मन-सागर

अथांग पसरला सागर

मना किती घालू आवर?

सागरी लाट हेलकावे

मनी भावना आंदुळे

सागरात किती मोती

मनी दडविली नाती

सागरी भरती ओहोटी

कधी मनातलं ओठी

सागरांत दीपस्तंभ

मनी निश्चयाचा सुंभ

सागर सर्वव्यापी

मन असे अविनाशी

सागरा म्हणती जीवन

मन असे संजीवन

सागर अगस्तीला भ्याला

बुध्दीचा मनावरी घाला

सरिता सागराशी भेटे

मन भेटीला आसुसे

२४ एप्रिल २०००