A close up of a peacock's tail with a blurry background

कृष्ण माझा

कृष्ण माझा

POETRY

Kavita Saraf

9/6/20231 min read

white clouds and blue sky

तो कृष्ण माझा

कंसकपट ना मानी जो, तो कृष्ण माझा

कारागृहीं जन्मे जो, तो कृष्ण माझा

कालिंदीला अडवी जो, तो कृष्ण माझा

कौसल्या-यशोदा प्रेमी जो, तो कृष्ण माझा ।।१।।

कुटील इंद्र गर्वहरी जो , तो कृष्ण माझा

कालियावरी विजयी जो, तो कृष्ण माझा

करांगुलीवरी धरी गोवर्धन जो, तो कृष्ण माझा

कान्हा-राधा अद्वैती जो, तो कृष्ण माझा ।।२।।

कुशल वाजवी पावा जो, तो कृष्ण माझा

कालिंदी तटी धेनु चारी जो, तो कृष्ण माझा

कंस-चाणूरा लोळवी जो, तो कृष्ण माझा

कांता ज्याची रुक्मिणी जो, तो कृष्ण माझा ।।३।।

कुंतीपुत्रा प्रियसखा जो,तो कृष्णा माझा

कृष्णेची राखे लाज जो, तो कृष्णा माझा

कौरवांवरी बरसे जो, तो कृष्ण माझा

कुरूक्षेत्री सारथी जो, तो कृष्ण माझा ।।४।।

कर्म सिद्धांती वदे गीता जो, तो कृष्ण माझा

कृपाकरी वसुदेव-देवकी जो, तो कृष्ण माझा

कजाग सांबे मुक्ती जो, तो कृष्ण माझा

कालातीत जना प्रिय जो, तो कृष्ण माझा ।।५।।


© कविता सराफ

सप्टेंबर ६, २०२३