a row of colorful flowers sitting on top of a table

नाडी बदल मुद्रा

nadibadal

ABHYAS

Kavita Saraf

8/9/20221 min read

ऑगस्ट ९, २०२२ रोजी, श्री स्वामी राधिकानंद सरस्वती ताई यांनी कार्यशाळेत सांगितल्यानुसार -

नाडी ओळखणे

सुखासनात बसून एक नाकपुडी बंद करून सावकाश श्वास घेणे आणि उच्छवास करणे हीच क्रिया दुसरी नाकपुडी बंद करून करणे. प्रत्येक व्यक्तीची एक नाकपुडी दुसऱ्या नाकपुडीपेक्षा अधिक सक्षम असते. जर उजव्या नाकपुडीने डाव्या नाकपुडीपेक्षा, श्वास-उच्छवास हि क्रिया सुलभतेने करता येत असेल तर त्या व्यक्तीची सूर्य नाडी आहे असे समजावे. जर डाव्या नाकपुडीने उजव्या नाकपुडीपेक्षा, श्वास-उच्छवास हि क्रिया सुलभतेने करता येत असेल तर त्या व्यक्तीची चंद्र नाडी आहे असे समजावे.

नाडीबदल

ज्यांची सूर्य नाडी आहे त्यांनी त्यांची चंद्र नाडी कशी अधिक सक्षम होईल त्याकडे लक्ष द्यावे - त्यासाठी सूर्य नाडी म्हणजे उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि तो श्वास जेवढा वेळ रोखून धरता येईल तेवढा वेळ रोखून धरून म्हणजेच ‘कुंभक’ करून मग हळूहळू सोडावा. हि क्रिया अधिकाधिक वेळेला करावी आणि श्वास रोखून धरण्याचा वेळ वाढवावा. एकदम श्वास रोखून धरता आला नाही तर थोडा श्वास सोडून परत घ्यावा आणि हळूहळू सोडावा. बरीच आवर्तने केल्याने हि क्रिया अधिकाधिक सुलभ होईल. तसेच ज्यांची चंद्र नाद अधिक सक्षम आहे त्यांनी सूर्य नाडी अधिक सक्षम करावी .....वरीलप्रमाणे डावी नाकपुडी बोटाने बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास-कुंभक-उच्छवास हि क्रिया करावी. जर कोणताही त्रास होत असेल उदाहरणार्थ - डोकेदुखी, हार्टबर्न, प्लपिटेशन ... तर नाडीबदल करून पाहावा म्हणजे सूर्य नाडी असल्येल्या व्यक्तींनी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास-कुंभक-उच्छवास करणे. हे केल्याने साधारण त्या व्यक्तीला ३० मिनिट अवधी वैद्यकीय सेवा मिळेपर्यंतची वेळ सुसह्य होऊ शकते. तसेच चंद्र नाडी असलेल्यांनी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास- उच्छवास करावा.

टीप –

  • दोन्ही नाड्या - सूर्य आणि चंद्र नाड्या सारख्या क्षमतेने चालू शकतात ती वेळ म्हणजे जेव्हा सूर्य आणि चंद्र दोन्ही आकाशात दिसतात - संधीकाळ किंवा पहाट

  • स्वतःची नाडी ओळखून किंवा जर काही त्रास होत असेल तर,

  • किंवा वेळेनुसार नाडीचा वापर करावा,

  • सूर्य आकाशात असेल तर चंद्र नाडी वापरून समतोल राखावा.

  • चन्द्र आकाशात असेल तर सूर्य नाडी वापरून समतोल राखावा.

  • नाडीबदल करताना खालीलपैकी कोणतीही किंवा आपल्या जन्मतारखेनुसार मुद्रा करावी

  • ह्या शास्त्राला 'शिवस्वरोदय' शास्त्र म्हणतात, भगवान शंकराने पार्वतीला सांगितलेले शास्त्र

  • नाडीबदल किंवा मुद्रा करताना आपल्या गुरूंनी जो जप आपल्याला सांगितला आहे तो म्हणावा किंवा ‘ॐ गुरु’, ‘ॐ’ असं काही म्हणावं किंवा त्या-त्या मुद्रेचा बीज मंत्र म्हणावा

"Shiv Swarodaya - A Divine Law of Breathing". The Science of Swarodaya is given by Lord Shiva to this world and was propagated by Yogis. One who recites it during the lunar or solar eclipses, obtains all Siddhis (supernatural powers). One who keeps sitting at his place, takes little food, practices concentration and knows the Supreme Lord will obtain the knowledge of Swaras. On Parvati’s prayer, God Shiva gave this knowledge of science to her for the welfare of human beings.

७ चक्र-७ मुद्रा

टीप -

  1. प्रत्येक मुद्रा केल्यानंतर, कुठे स्नायूंची हालचाल जाणवते त्याचे निरीक्षण करणे

  1. सुखासनात आणि शांतपणे बसून मुद्रा केल्याने विशिष्ट अवयवांमध्ये स्नायूंची हालचाल जाणवते

  1. ७ मुद्रा ७ चक्र सुधारण्यासाठी करतात

  1. आपल कुठलं चक्र अधिक सक्षम करायचे त्यासाठी सोपी परीक्षा -

वाईट/दुःखदायक/तणाव वाढवणारी बातमी ऐकल्यानंतर आपली पहिली शारिरीक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे असेल तर त्या-त्या चक्रावर मेहनत घेणे आवश्यक

अशी बातमी ऐकून पहिली प्रतिक्रिया जर -

  • पाय लटपटणे/मटकन खाली बसणे - मूलाधार चक्र

  • सू/परसाकडे ची भावना - स्वाधिष्ठान चक्र

  • पोटात खड्डा पडणे - मणिपूर चक्र

  • हृदय धडधडणे - अनाहत चक्र

  • बोलणं बंद होणं/बोलताच न येणं - विशुद्ध चक्र

  • डोळ्यातून घळाघळा पाणी येणं - आज्ञा चक्र

  • डोकं गरगरणे - सहस्त्रार चक्र


संकलन - कविता सराफ