people walking on side walk beside beach

दक्षिण मुंबई, SoBo Culture आणि थिएटर्स

SoBoCulture

आठवणी

Kavita Saraf

12/22/20251 min read

दक्षिण मुंबई, SoBo Culture आणि थिएटर्स

आम्ही जगन्नाथ चाळीत, फणसवाडीत राहायचो म्हणजे South Bombay, heart of the city. SoBo Culture आणि ह्या जागेचा charm जे तिथे राहिले आहेत त्यांना लगेच कळेल. इथून सगळ्या जागा खूप जवळ होत्या...बँक्स, पोस्ट ऑफिसेस, हॉस्पिटल्स, थिएटर्स, कॉलेजेस, चौपाटी, जिमखाना, भुलेश्वर, कापड मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ताज महाल-नटराज-सम्राट हॉटेल्स, एअर इंडिया, LIC office, जहांगीर आर्ट गॅलरी, म्युझियम्स आणि ही यादी वाढतंच राहील ....

मी कॉलेज मध्ये असताना SoBo Culture अगदी जवळून बघितलं आणि अनुभवलं आहे ...कॉलेजमध्ये अत्यंत श्रीमंत आणि तितकेच down to earth मुलं-मुली यायचे, आमचे शिकवणारे प्रोफेसर्स पण PhD झालेले, outgoing आणि कलानिपुण होते. कॉलेज डेजना सगळे जण खूप उत्साहाने आम्हाला प्रोत्सहन द्यायचे, Wilsonian आणि Kiran annual festivals मध्ये स्वतः पण सहभागी असायचे. विल्सन कॉलेज ही हेरिटेज वास्तू होती आणि खूप वेळा तिथे कुठल्या ना कुठल्या सिनेमाचं शूटिंग सुरु असायचं मग आम्हाला खूप दूरचा रस्ता घेऊन लॅब्स मध्ये जावं लागायचं, लॅब्स असतील त्या दिवशी ८-१० तास आम्ही कॉलेज मध्ये असायचो. कॉलेज च्या लायब्ररीचं location ईतकं मस्त होतं की सगळा समुद्र तिथून दिसायचा ...माझा अभ्यास करण्यापेक्षा समुद्र, लाटा, चौपाटीचा कट्टा बघण्यात वेळ जायचा. मणिभवन, बाबुलनाथ, चौपाटी, सुख- सागर, कॉर्नर कुल्फीवाला, सॅन्डविचवाला ही आमची घोळका करून जायची ठिकाणं होती. मी विल्सन ला असताना बसने जायचे आणि येताना मात्र आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी चालत घरी यायचो. सगळ्यांत लांब मी राहायचे तरी बरोबर सगळेजण असल्यामुळे मी किती चालले आहे त्याकडे कधीच लक्षं नसायचं....तेंव्हा fitness app असतं तर त्यावर one -way २५,००० स्टेप्स तरी नक्की नोंदल्या गेल्या असत्या. पुढे ग्रॅज्युएशनच्या वेळी चर्चगेटला कॉलेज, चर्नी रोड ते चर्चगेट हे फक्त मध्ये १ स्टेशन असलेलं अंतर होतं तरी आम्हांला ट्रेन पास concession मध्ये मिळायचा म्हणून आम्ही ट्रेनने जायचो. कॉलेज फारतर ६ तास असायचं त्यामुळे मोकळा वेळ पण खूप असायचा. तेव्हा कधी Archies Gallery मध्ये तासंतास घालवणं, एशियाटिक पण जवळच होतं तिथे लायब्ररीत जाऊन बसायचं किंवा विंडो शॉपिंग, नाहीतर नरिमन पॉईंट ला फिरायला जाणं, आरे लस्सी, मसाला मिल्क स्टॉलवर गप्पा मारत उभं राहायचं, जहांगीरला जाऊन पेंटिंग्स, म्युरल्स, सकल्प्चर्स or any art forms बघायला जायचो. कधी घरी येताना चर्चगेट स्टेशनवर तासंतास मित्र-मैत्रिणींशीं गप्पा मारत किती वेळ गेला आहे हे कळायचंच नाही. कधी प्रोफेसर्सना कंटाळा आला शिकवण्याचा तर 'guess what/who' सारखा खेळ आम्ही खेळायचो आणि कमीतकमी que मध्ये कोण ओळखतं आहे त्यासाठी चढाओढ असायची. आमचे स्टॅटिस्टिकस आणि इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर्स मराठी होते त्यामुळे त्यांच्याबरोबर पण गप्पा मारायला खूप मजा यायची. कॉलेजच्या वर्गातून खूप झाडं दिसायची आणि त्यावरचे पक्षी बघत खिडकीत उभं राहणं हा पण एक मस्त विरंगुळा होता. एकदा आम्ही सगळे क्लास मास बंक करून इरॉस ला मूवी साठी गेलो होतो आणि Groove नुकतचं सुरु झालं होतं तिथे जाऊन ३-४ तास कसे निघून जायचे ते कळायचंच नाही. आमच्या वेळी आम्ही मराठी मंडळात वगैरे भाग घेतला नव्हता पण क्षिप्रा गाण्यांत उत्साही असायची आणि मी तिच्याबरोबर प्रॅक्टिस आणि मदत करायला जायचे. Auditorium मध्ये खूप धमाल आणि मस्ती सुरु असायची आमची. अभ्यासाच्या वेळी आमच्या (माझ्या आणि क्षिप्राच्या) नोट्सवर सगळ्यांची भिस्त असायची....आम्ही परीक्षेच्या वेळी K आणि P अशी आडनावं असल्यामुळे पुढच्या-मागच्या बेंचवर असायचो तेव्हा सगळ्यांना this is not the optimum utilization of available resources (स्टॅटिस्टिकस मध्ये हा कन्सेप्ट आहे) असं वाटायचं आणि त्यावर Pun सुरु असायचं. मी एकदा कॉलेजमधून सगळ्या faculty आणि divisions मधून पहिली आले होते तेव्हा मला Annual Program चं Invitation घरी पोस्टाने आलं होतं आणि certificate + काहीतरी gift मिळालं होतं. तो program संध्याकाळी होता तेव्हा मी आणि माई ते function attend करून मग नरिमन पॉईंटला रात्री फिरायला गेलो होतो. आम्ही सगळे एकमेकांचे इतके मस्त मित्र-मैत्रिणी झालो होतो की गणपती, दिवाळी, सुट्टीत एकमेकांना घरी बोलवायचो. एकत्र शॉपिंग, कधीतरी बाहेर खाणं अशी खूप धमाल कॉलेज डेज मध्ये केलेली आठवते आहे. पुढे पोस्ट-ग्रॅज्युएशन साठी कालिनाला पण खूप छान कॅम्पस होतं पण तरी त्याला कधीही SoBo जागांची, SoBo crowd आणि SoBo मित्र-मैत्रिणींची ची ग्रेस आली नाही...

माझी दोन्ही कॉलेजेस समुद्राजवळ आणि अत्यंत elite area मध्ये होती आणि त्याच्या आजूबाजूला खूप थिएटर्स Eros, Regal, Capitol, New Excelsior, Opera House होती. ह्या थिएटर्स मध्ये इंग्लिश pictures लागायचे आणि त्याची पोस्टर्स कॉलेजला जाता-येता दिसायची. मी आणि माझ्या मैत्रिणींनी इथे बरेच इंग्लिश pictures पहिले आहेत. त्याचं प्लानिंग, तिकीट बुकिंग, कधी घरच्यांसोबत एकच picture दोनवेळा लागोपाठ बघणं असे बरेच उद्योग केले आहेत. तेव्हा आम्ही Honey I Shrunk the Kids, Baby's Day Out, Free Willy, Indiana Jones चे बरेचसे पार्टस, The Mask, Troy, Home Alone all parts, Titanic, Inception, devil's advocate, gold rush, Schindler’s List, life is beautiful, scream, Jurassic Park चे बरेच भाग, A Perfect World, Rudy, Marlie and Me, Finding Nemo, Star Wars, Star Trek, Coral Reefs, Speed all parts, Matrix, Charlie's Angels. सगळ्या Herbie movies ... मुळे inspired असल्यामुळे मी आमच्या सगळ्या गाडयांना पण नावं ठेवली आहेत...२ अक्षय्या, मृगया, शीतल, हर्षदा...
कधी classic movies festivals लागायची ह्या थिएटर्स मध्ये तेव्हा Roman Holiday, Guns of Navarone, Charade, My Fair Lady, Sound of Music असे आणि कितीतरी pictures अजूनही आठवतात....आजही मला सगळ्या genre चे pictures बघायला आवडतात पण ती taste मी SoBo मध्ये राहत असताना develop झाली आहे आणि मी अजूनही ती SoBo संस्कृती मिस करते.

कविता सराफ
© २२ डिसेंबर २०२५